धुळे टुडे १ साठी...
---
धुळे जिल्ह्यात ९ नोव्हेंबरला
दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी
---
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे सुधारित आदेश
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात ९ नोव्हेंबर २०२६ ला स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुटीत हा बदल करून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी हा सुधारित आदेश निर्गमित केला.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहीर करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारांचा वापर करून धुळे जिल्ह्यासाठी सन-२०२६ मध्ये स्थानिक सुट्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीतील अनुक्रमांक तीननुसार ६ नोव्हेंबर २०२६ ला धनत्रयोदशीनिमित्त स्थानिक सुटी निश्चित करण्यात आली होती. मात्र, या सुटीत बदल करून दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबरला स्थानिक सुटी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी घेतला आहे. ही सुधारित स्थानिक सुटी धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी लागू राहणार आहे. या आदेशाची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुखांना दिल्या आहेत.
---