टुडे पान १ साठी..अवतीभवती

टुडे पान १ साठी..अवतीभवती
Published on: 
धुळे : टुडे पान १ साठी..अवतीभवती -- लग्नाचे आमिष; तरुणीवर अत्याचार धुळे : लग्नाचे आमिष दाखवून कॉलेज तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. धुळे तालुक्यातील पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार, अमोल अनिल चव्हाण (रा. उंबरखेडे, जि. छत्रपती संभाजीनगर, ह. मु. आयटीआय वसतिगृह) याने १० ऑगस्ट २०२५ ते २६ सप्टेंबर या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून तिला गोंदूर रोड, वडेल रोड, दत्त मंदिर परिसरातील एका रुग्णालयावरील लॉजमध्ये नेऊन तिचे शोषण केल्याचा आरोप आहे. -- दुचाकीच्या धडकेत पन्नास वर्षीय ठार धुळे : सालटेक (ता. साक्री) गावशिवारात भरधाव दुचाकीने धडक दिल्याने अनिल दगाजी सोनवणे (रा. जुनी बारी, पेरेजपूर, ता. साक्री) यांचा मृत्यू झाला. तुषार साहेबराव पाटील (रा. नंदाळे) यांच्या फिर्यादीनुसार, सोनवणे हे दुचाकीने जात असताना दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यावरून निजामपूर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -- किराणा दुकानातून तंबाखूसाठा जप्त धुळे : साक्री शहरातील बाजारपेठेतील किराणा दुकानावर छापा टाकून पोलिसांनी ४९ हजारांचा गुटखा जप्त केला. राजेश माणकचंद कर्नावट (रा. रुपाईनगर, साक्री) यांच्या प्रतीक प्रोव्हिजन किराणा दुकानावर २८ सप्टेंबरला दुपारी ही कारवाई झाली. दुकानातून केसरयुक्त विमल पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात कर्नावट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com