धुळ्यात आज महापौर उपोषण

धुळ्यात आज महापौर उपोषण
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, सेकंडमेन -- फोटो क्रमांक ः 35339 धुळे ः क्यूमाईन क्लबजवळ महापौरांच्या उपोषणापूर्वी बुधवारी रात्री मंडपासंबंधी सुरू असलेली तयारी. -- लोगो.... अवैध व्यवसायांचा प्रश्‍न -- धुळ्यात महापौरांचे आजपासून बेमुदत उपोषण - ‘आयजीं’ची शिष्टाई निष्फळ; मनपाकडून तीन कत्तलीचे केंद्र जमीनदोस्त होणार - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ ः गोवंश तस्करी, अवैध कत्तलखाने, बनावट मद्य आणि गुटखा रॅकेटविरोधात कठोर कारवाई करण्यासह सोशल मीडियावरून होणाऱ्या बदनामीकारक आरोपांप्रकरणी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी भाजपच्या महापौर मायादेवी परदेशी गुरुवारी (ता. १९) सकाळी दहापासून क्यूमाईन क्लबजवळ उपोषणाला बसणार आहेत. तत्पूर्वी, धुळ्यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी बुधवारी (ता. १८) सायंकाळी घेतलेली मध्यस्थीची बैठक निष्फळ ठरल्याने महापौरांनी आपल्या आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. - पंधरवड्यापासून शहरात गोवंश तस्करी, अवैध कत्तलखाने, प्रतिबंधित गुटखा आणि बनावट मद्यविक्री या मुद्द्यांवरून सोशल मीडियावर सत्ताधारी भाजप नेते आणि गोरक्षक, काही विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक संघर्ष सुरू आहे. यातील निराधार आरोपांमुळे नाहक बदनामी होत असल्याने महापौर परदेशी यांनी सोमवारी (ता. १६) जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन देऊन चार दिवसांत कारवाईचा लेखी अहवाल मागितला होता. अन्यथा, उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. - महापौर, आयजींची बैठक दरम्यान, महापौरांनी उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक येनपुरे यांनी बुधवारी सायंकाळी साडेसहाला येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात महापौरांना चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीला आमदार अनुप अग्रवाल आणि जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद उपस्थित होते. श्री. येनपुरे यांनी महापौरांच्या मागणीनुसार सर्व कायदेशीर कारवाई करण्याचे आणि तसे लेखी पत्र देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ‘आता उपोषण केले नाही तर जनतेत चुकीचा संदेश जाईल आणि आमच्याविषयी गैरसमज निर्माण होतील,’ अशी ठाम भूमिका महापौरांनी मांडली. - उपोषणावर ठामच चर्चा निष्फळ ठरल्याने महापौर ठरल्याप्रमाणे गुरुवारपासून उपोषण सुरू करणार असल्याची माहिती त्यांचे पती तथा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. ‘कथित गोरक्षक आणि काही विरोधकांकडून सोशल मीडियावर केले जाणारे आरोप तथ्यहीन आहेत. कायदा सर्वांसाठी समान असून, दोषी कोणत्याही पदाचा किंवा पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. प्रसंगी महापौरपदाचा राजीनामा देईन, पण निराधार आरोप सहन करणार नाही. जोपर्यंत दोषींना अटक होत नाही, तोपर्यंत उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहीन, असे महापौर परदेशी यांनी ‘सकाळ''शी बोलताना स्पष्ट केले. - १४-१ ...चौकट... १४-१ महापालिकेचीही आज कारवाई दरम्यान, महापौरांच्या उपोषणापूर्वीच महापालिका प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलीशी संबंधित ‘सील’ असलेली तीन दुकानेवजा केंद्रे अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत गुरूवारी जमीनदोस्त करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. ‘त्या’ संबंधित आस्थापनांना पंधरा दिवसांपूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महापालिकेने पोलिस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली असून, महापौरांचे उपोषण सुरू होताच ही मोहीम राबवली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.