धुळे सोनसाखळी लांबवली

धुळे सोनसाखळी लांबवली
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी --- फोटो क्रमांक ः 34918 धुळे : सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चेन स्नॅचर. --- मॉर्निंग वॉकला जाताय... सावधान! मिल परिसरात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ ः शहरात पुन्हा एकदा धूम स्टाइल चोरांनी डोके वर काढले असून, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची सोनपोत दुचाकीस्वार चोरट्यांनी भरदिवसा ओरबाडून नेली. मिल परिसरातील शासकीय दूध डेअरीजवळ असलेल्या नवनाथ मंदिराजवळ गुरुवारी (ता. १२) सकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे मॉर्निंग वॉकर्समध्ये आणि महिला वर्गात मोठी दहशत पसरली आहे. थंडीचे दिवस सुरू झाल्याने आरोग्याची काळजी म्हणून पहाटेच्या गुलाबी थंडीत व शुद्ध हवेत फिरण्यासाठी धुळेकर मोठ्या संख्येने बाहेर पडतात. यामध्ये पुरुषांसह महिला व तरुणींची संख्याही मोठी असते. हीच संधी साधून चैन स्नॅचर्स सक्रिय झाले आहेत. मिल परिसरातील नवनाथ मंदिराजवळ राहणाऱ्या अनुपमा अजिज वर्मा या नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. त्या नवनाथ मंदिराजवळून जात असताना मागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनपोत हिसकावली. अनपेक्षित या प्रकारामुळे वर्मा यांनी आरडाओरड केली; परंतु त्याआधीच चोरांनी दुचाकीवरून धूम ठोकली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू झाली. तत्पूर्वी, घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक अर्चना पाटील, सहायक पोलिस निरीक्षक धोंगडे, पोलिस कर्मचारी महेश मोरे, संजय सूर्यवंशी यांच्यासह ‘डीबी’ पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका कॅमेऱ्यात दुचाकीवरील दोन्ही संशयित चोरटे कैद झाल्याचे स्पष्ट झाले. दोघांनीही चेहऱ्याला रुमाल बांधल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला असून, शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.