धुळे ः टुडे १ साठी....सुधारित.......ॲंकर
---
फोटो- NSK26H31522
धुळे : अनधिकृत बॅनर्सप्रश्नी ऑनलाइन प्रणालीद्वारे पंचनामा करतांना मनपाचे अधिकारी.
---
अनधिकृत बॅनरबाजांना दीड कोटी दंडाचा दणका!
---
महापालिकेची ऑनलाइन कारवाई; विनापरवानगीतील २०० होर्डींग्ज, बॅनर्सचे पंचनामे
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : शहरात सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग, बॅनर व इतर जाहिरात फलकांवर आळा घालण्यासाठी महापालिकेने अद्ययावत ऑनलाइन जाहिरात परवाना व दंडात्मक कारवाई प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रक्रियेतून आतापर्यंत २०० अनधिकृत होर्डींग्ज, बॅनर्सचा ऑनलाइन पंचनामा पूर्ण करण्यात आला असून, संबंधितांना दीड कोटींवर रकमेच्या दंडाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, अधिकृतरित्या जाहिरांच्या ऑनलाइन परवानग्यांतून महापालिकेला सहा लाखांवर उत्पन्न प्राप्त झाले.
-
आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनात विकसित करण्यात आलेल्या ऑनलाइन परवानगी व दंडात्मक कारवाईच्या या प्रणालीला प्रतिसाद मिळत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. एप्रिल ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन प्रणालीद्वारे एकूण ४३० जाहिरात परवाने देण्यात आले. त्यातून महापालिकेला सहा लाख आठ हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले.
-
अनधिकृतचे पंचनामे
दरम्यान, अनधिकृत जाहिरातील, होर्डींग्ज व इतर बॅनरबाजीविरोधात महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डींग्ज व बॅनरची नियुक्त चार क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र माईनकर, किशोर शिंदे, किशोर वाघ, सागर जकातदार यांच्यामार्फत जागेवर पाहणी करून ऑनलाइन पंचनामा करण्यात येत आहे. स्थळपाहणीवेळी बॅनरचा लाईव्ह फोटो, बॅनरवरील मजकूर, आवश्यक माहिती ऑनलाइन प्रणालीवर अपलोड केली जाते. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार दंडाची रक्कम निश्चित करून संबंधित व्यक्ती अथवा संस्थेला ऑनलाइन पद्धतीने दंडात्मक नोटीस बजावण्यात येते. या प्रक्रियेमुळे कारवाईमध्ये पारदर्शकता, अचूकता आणि गतिमानता आल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
--
महापालिकेचे आवाहन
शहरातील रस्ते, चौक, विद्युत खांब तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत जाहिराती व बॅनर्समुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग, बॅनर किंवा जाहिराती लावणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. महापालिकेची रीतसर ऑनलाइन परवानगी घ्यावी, शहराचे सौंदर्य व स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले.
-
१४-१
...चौकट...
१४-१
८६ हजाराची वसुली
ऑनलाइन पंचनामा प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत शहरातील विविध ठिकाणी असलेल्या २०० अनधिकृत होर्डींग्ज, बॅनरचे ऑनलाइन पंचनामे करण्यात आले व संबंधित व्यक्ती व संस्थांना एकूण एक कोटी ५० लाख ८१ हजार रुपयांच्या दंडात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८६ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. उर्वरित दंडाची वसुली करण्यासाठी महापालिका अधिनियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.