धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 34208
धुळे : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एनसीसीतर्फे काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत सहभागी विविध महाविद्यालयातील छात्र सैनिक. शेजारी शिक्षक.
--
धुळ्यात एनसीसीतर्फे
सायकल रॅली उपक्रम
--
रॅलीतून राष्ट्रीय एकात्मतेचा, देशप्रेमाचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ४८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने शनिवारी (ता. ३१) धुळ्यात सायकल रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश होता.
-
सकाळी सातला ४८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कार्यालयातून मेजर के. एम. बोरसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. कॅप्टन पंकज देवरे, कॅप्टन डॉ. शशिकांत खलाणे, फर्स्ट ऑफिसर बच्छाव, हवालदार जयसिंग जाधव, बलजींदर सिंग यांनी सहभाग नोंदविला. रॅलीमध्ये शहरातील झेड. बी. पाटील महाविद्यालय, एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालय, डॉ. पी. आर. घोगरे विज्ञान महाविद्यालय, विद्यावर्धिनी महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयातील ५० हून अधिक छात्र सैनिकांनी सहभाग घेतला. त्यांनी शिस्त, पर्यावरणपूरक जीवनशैली व एकात्मतेचा संदेश दिला. समारोपानंतर कॅप्टन डॉ. शशिकांत खलाणे यांनी उपस्थित छात्र सैनिकांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली. समादेशक अधिकारी कर्नल संजय कुमार, प्रशासकीय अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा, ट्रेनिंग जेसीओ सुखदेव सिंग, श्री. सोनार, श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम झाला.