धुळे पुणे रेल्वे सुरु करा

धुळे पुणे रेल्वे सुरु करा
Published on: 
धुळे टुडे २ साठी...मेन --- फोटो- NSK26H31568 धुळे : धुळे- पुणे- कोल्हापूर स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन स्टेशन प्रबंधक यांना देतांना ‘मी धुळेकर’ संघटनेचे पदाधिकारी. --- धुळे-पुणे-कोल्हापूर स्वतंत्र रेल्वे सुरू करा --- ‘मी धुळेकर’ संघटनेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : शहरातून पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची, विद्यार्थ्यांची व व्यापाऱ्यांची वाढती संख्या विचारात घेता ‘धुळे- पुणे-कोल्हापूर’ ही नवी स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करावी, अशी मागणी ‘मी धुळेकर’ संघटनेने मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांकडे केली. धुळे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणावरून दररोज हजारो विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण, उद्योजक आणि नोकरदार पुण्याकडे ये-जा करतात. तसेच नरडाणा व धुळे एमआयडीसीमध्ये उद्योग वाढल्याने व्यावसायिक प्रवाशांची संख्याही वाढली आहे. सध्या नागरिकांना खासगी वाहने अथवा बसने प्रवास करावा लागतो, जो आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात पर्यटन आणि कोल्हापूरच्या श्री अंबाबाई (महालक्ष्मी) दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. पुण्यातील जागेच्या अडचणीवर नवा पर्याय धुळे- पुणे रेल्वेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पुणे स्टेशनवर टर्मिनल व पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याचे कारण रेल्वे प्रशासनाकडून दिले जाते. यावर पर्याय म्हणून ही रेल्वे ‘धुळे ते कोल्हापूर व्हाया पुणे’ अशी सुरू केल्यास धुळे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी टर्मिनल स्टेशन व पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. या मार्गावर रेल्वेच्या देखभालीसाठीमनमाड, दौंड किंवा मिरज या स्टेशनचा उपयोग केला जाऊ शकतो, असेही ‘मी धुळेकर’ संघटनेने निवेदनात म्हटले आहे. धुळे- मुंबई एक्स्प्रेसप्रमाणेच या नव्या मार्गालाही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यास धुळे स्टेशन परिसरात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, तसेच खानदेशातील उद्योग, शिक्षण व पर्यटन क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल अशी मागणी ‘मी धुळेकर’ संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल, फरदीन शेख, सलमान पठाण आदींनी केली. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com