रेल्वेमार्ग मोजणीला आर्वीत विरोध

रेल्वेमार्ग मोजणीला आर्वीत विरोध
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी......(या बातमीला अपेक्षित जागा नसल्यास....शिल्लक ठेवावी) -- फोटो क्रमांक ः 32292 आर्वी : रेल्वेमार्गाच्या मोजणीवेळी अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेली चर्चा. -- रेल्वेमार्ग मोजणीला आर्वीत विरोध - मनमाड- इंदूर सेवेचा प्रश्‍न; जमीनमालकांचे आक्षेप सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : मनमाड- इंदूर नवीन रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आर्वी (ता. धुळे) शिवारात विरोध झाला. संयुक्त मोजणीसाठी सोमवारी (ता. १२) गेलेल्या महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या पथकाला जमीनमालकांच्या आक्षेपांमुळे मोजणी पूर्ण न करताच परतावे लागले. मनमाड- इंदूर रेल्वेमार्गासाठी धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. पुरमेपाडा ते बाळापूर या टप्प्यात संपादित होणाऱ्या जमिनीची संयुक्त मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी तथा रेल्वे भूसंपादनासाठी सक्षम प्राधिकारी रोहन कुवर यांच्या कार्यालयाकडून संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. भूमी अभिलेख विभागाने मोजणीच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार १२ ऑक्टोबरपासून सुरू झालेली मोजणी २१ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. - भरपाईबाबत प्रश्न आर्वी शिवारात मोजणीसाठी गेलेल्या पथकाला जमीनमालकांनी आक्षेप घेत रोखले. भूसंपादनाची प्रक्रिया, भरपाईचे दर आणि संपादित होणाऱ्या क्षेत्राची माहिती याबाबत स्पष्टता मिळाल्यानंतरच मोजणी करावी, अशी भूमिका काही जमीनमालकांनी घेतल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही जिल्ह्यातील काही गावांमध्ये भरपाईचा दर, जमिनीचे अचूक क्षेत्र, पर्यायी रस्ते, सिंचन सुविधांवरील परिणाम आणि शेतजमिनींचे तुकडीकरण यांसारखे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आर्वी शिवारातील विरोधानंतर नियोजित मोजणीचे पुढील टप्पे कसे पार पडतात, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com