धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- पंधरा महिलांचे दागिने रथोत्सवात लांबविले धुळे : शहरातील रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी १५ महिलांचे मंगळसूत्र, सोन्याच्या पोती आणि चांदीचे वाळे लूटून नेले. या दागिन्यांची एकूण किंमत एक लाख ३५ हजार ५०० रुपये आहे. गल्ली क्रमांक चारमधील राणा ट्रान्सपोर्टजवळील दिशा प्रविण राठोड या २२ ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास परिसरातील रथोत्सवात सहभागी झाल्या होत्या. त्या वेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिन्यांसह अन्य १४ महिलांचे दागिने नेले. अनेक महिलांचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दिशा राठोड यांच्या फिर्यादीनुसार आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - ट्रॅक्टर- ट्रॉली लंपास; फसवणुकीचा गुन्हा धुळे : विश्वासाने दिलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली परत न करता परस्पर नेऊन कॉन्ट्रॅक्टरची एक लाख २५ हजारांची फसवणूक केल्याची घटना सुरत बायपास रस्त्यालगत २३ ते २४ सप्टेंबरदरम्यान घडली. या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रमोद एकनाथ शेलार (रा. प्लॉट क्रमांक ३२, लक्ष्मीनगर, अभय कॉलेज रोड, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी एक लाख किमतीचे ट्रॅक्टर (एमएच १८ एन ८८३८) आणि २५ हजारांची ट्रॉली (एमएच १८ एन २६१०) राकेश रामसिंग भाबोर (रा. करदवाड कलान, जि. झाबुवा, मध्य प्रदेश) याच्याकडे विश्वासाने सोपविली होती. मात्र, त्याने ही वाहने परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर नेऊन फसवणूक केली. - वीज कर्मचाऱ्याला मारहाणीचा गुन्हा धुळे : जुना वडजाई रोड परिसरातील विश्वकर्मानगरजवळ वीजखांबावरील वायरी काढण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरिफउद्दीन रियाजउद्दीन शेख (रा. विश्वकर्मानगर, जुना वडजाई रोड, धुळे) याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वीजखांबावरील वायर काढण्यासाठी कंपनीचे कर्मचारी गेले असता शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास संशयिताने छोटू निंबा रोकडे यांना काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्याने रोकडे यांची शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करून हातपाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याची फिर्याद आहे. - ट्रान्सफॉर्मरची तोडफोड; सहा लाखांचे नुकसान धुळे : ब्राह्मणवेल (ता. साक्री) शिवारात घाटगे-पाटील इंडस्ट्रीजच्या टॉवरजवळ असलेल्या कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून तांब्याचे वाइंडिंग लीड्स चोरीस गेल्याची घटना २२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकारात ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याने सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरवर दगडफेक करून तोडफोड केली. तसेच सुमारे ८० हजार रुपये किमतीचे तांब्याचे वाइंडिंग लीड्स नेले. कंपनीचे सुरक्षा अधिकारी हंसराज दयाराम शिंदे (रा. सामोडे, ता. साक्री) यांच्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. -
Marathi News Esakal
www.esakal.com