धुळे ः टुडे ३ साठी
--
वीजपुरवठ्यावरून वाद
अभियंत्याला धमकी
धुळे : गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याच्या कारणावरून फोनवर शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माधव गोविंदराव जाधव याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता निखिल क्षीरसागर यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी (ता. २८) दुपारी ते कार्यालयात कर्तव्यावर असताना पुरमेपाडा (ता. धुळे) येथील जाधव याने फोन करून गावातील वीज का बंद केली, अशी विचारणा करत शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली.
-
गळफास घेतल्याने
तरुणाचा मृत्यू
धुळे : घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतल्याने चंद्रकांत विजय पाटील (वय २१, रा. ब्राह्मणे, ता. शिंदखेडा) या तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. २८) पहाटे पाचच्या सुमारास तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
कंपनी आवारातून
१३ हजारांची चोरी
धुळे : अवधान (ता. धुळे) एमआयडीसी परिसरातील एमएसपीव्हीएल कंपनीच्या आवारातून १३ हजार किमतीची ६५० मीटर लांबीची डीसी केबल चोरीला गेली. याप्रकरणी कंपनीचे तंत्रज्ञ सागर पाटील यांच्या फिर्यादीनुसार मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-