धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33502
धुळे : धुळे तालुका निवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वार्षिक सभेत प्रतिमेचे पूजन करताना पदाधिकारी, मान्यवर.
--
दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीसाठी निधी जमा करा
अनंतराव पाटील : निवृत्त शिक्षक संघाच्या वार्षिक सभेत आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीसाठी निधी जमा करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अनंतराव पाटील यांनी केले. धुळे तालुका निवृत्त प्राथमिक शिक्षक संघाची वार्षिक सभा शुक्रवारी (ता. २३) देवपूर येथील पेन्शनर भवन येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अशोक शिरुडकर अध्यक्षस्थानी होते. जिजाबराव पाटील यांनी अनुमोदन दिले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर रमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. गेल्या काही महिन्यांत निधन झालेल्या शिक्षकांना व सदस्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेदरम्यान २०२५-२६ चा वार्षिक अहवाल तालुका प्रतिनिधींकडे सोपवण्यात आला. तसेच, मागील सभेचे इतिवृत्त व जमा- खर्चाचे वाचन रमेश पाटील यांनी केले. बैठकीत मुरलीधर नानकर यांची धुळे तालुका सरचिटणीस पदी बहुमताने निवड केली. जिल्हाध्यक्ष अनंतराव पाटील, जिल्हा सरचिटणीस जिजाबराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील उपस्थित होते. अनंतराव पाटील यांनी पेन्शनर शिक्षकांच्या अडचणींवर भाष्य करत दुष्काळग्रस्त निधीसाठी आवाहन केले. जिजाबराव पाटील व अरविंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. धुळे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, श्री. वाणी, प्रभाकर भामरे, सुभाष भामरे, श्री. शिसोदे, गबा पाटील, मोहन पाटील, किशोर अहिरे, श्री. जगताप, श्री. बाविस्कर, प्रभाकर रायते, श्री. बोरसे, सुभाष देसले, रमेश पाटील, छोटूलाल पाटील, श्री. चौधरी, श्री. बडगुजर, शिवाजी पाटील, शिवाजी वाघ, कैलास भामरे, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.