धुळे : टुडे पान २ साठी....
--
फोटो क्रमांक : 33870
धुळे : जिल्ह्यात होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजन बैठकीस उपस्थित शिक्षणाधिकारी डॉ. मनीष पवार. शेजारी प्रमोद पाटील, सुधाकर बागुल आदींसह तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व विज्ञान संघाचे पदाधिकारी, आदी.
--
जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शनाच्या
तयारीसाठी नियोजन बैठक
--
विज्ञान प्रदर्शनासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि जिल्हा विज्ञान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी विज्ञान प्रदर्शनांच्या तयारीसाठी नियोजन बैठक नुकतीच शिक्षणाधिकारी कार्यालयात झाली. शिक्षणाधिकारी डॉ. मनीष पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीस उपशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, विज्ञान पर्यवेक्षक सुधाकर बागूल उपस्थित होते.
-
बैठकीत साक्री, शिरपूर, शिंदखेडा, धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या ठिकाणी होणाऱ्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनांच्या तयारीचा व नियोजनाचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासंदर्भात मार्गदर्शन करत शिक्षणाधिकारी पवार यांनीसूचना केल्या. बैठकीला शिंदखेडा गटशिक्षणाधिकारी चंदन शिवदे, शिरपूर गटशिक्षणाधिकारी विठ्ठल घुगे, धुळे गटशिक्षणाधिकारी शुभम पाटील, साक्री गटशिक्षणाधिकारी कविता मेखे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष शांताराम कदम, सचिव उदय तोरवणे, जिल्हा विज्ञान संघाचे सचिव संजय गोसावी, उपक्रम समितीप्रमुख रविंद्र चित्ते, शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम. डी. पाटील, शिंदखेडा विज्ञान संघाचे अध्यक्ष सुधाकर माळी, धुळे ग्रामीण अध्यक्ष भागवत पाटील, सचिव रणजीत शिंदे, धुळे शहर अध्यक्ष हर्षल पवार उपस्थित होते.