धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33440
धुळे : भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिरात उपस्थित मान्यवर.
--
धुळ्यात भाजप ज्येष्ठ नागरिक
आघाडीतर्फे आरोग्य शिबिर
--
जुन्या सिव्हिलमध्ये ज्येष्ठांची वैद्यकीय तपासणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, विविध आजारांचे वेळीच निदान करणे आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने येथील जुन्या सिव्हिल रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर झाले. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वात, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनात शिबिर झाले. वाढत्या वयानुसार उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचे वेळेत निदान व्हावे आणि निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता. परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यात सहभागी होत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी समीर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया म्हस्ने आणि बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) इन्चार्ज प्रतिभा घोडके यांच्या उपस्थितीत शिबिर झाले.
शिवाजीराव काकडे, प्रकाश उबाळे, सुनील देवरे, संतोष खंडेलवाल, आनंदा चौधरी, राजेंद्र चितोळकर, मधुसूदन शर्मा, राजेंद्र भदाणे, अशोक बोरसे, राजेंद्र मुजगे, गोकुळ साळुंके, बद्रीविशाल व्यास, नंदूभाऊ ठोंबरे, स्मिता पाटील, मालती ठाकरे, सुलभा देशपांडे, भरत ठाकरे, प्रकाश पाटील, एकनाथ देवरे, सुरेश बावा, विवेक कुलकर्णी, कृष्णा शिंदे, अनिल संचोती, राजेंद्र पिंगळे, सुनील खंडेलवाल, नामदेव पाटील, कचरूलाल कापसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.