धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- शिंदखेड्यात घरफोडी; दागिने, रोकड लंपास धुळे : शिंदखेडा शहरातील विजयनगर भागात घरफोडी करून चोरट्यांनी ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. याबाबत जगदीश बळीराम पाटील (वय ६९, रा. विजयनगर, शिंदखेडा) यांच्या फिर्यादीनुसार ३ ते २१ ऑक्टोबरदरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील गोदरेज कपाट फोडून ४८ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे कानातील रिंग टॉप, पाच ग्रॅम वजनाची अंगठी आणि २० हजार रुपये रोख, असा एकूण ६८ हजार रुपयांचा ऐवज नेला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात संशयित चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -- कचरा टाकण्यावरून वृद्धेच्या डोक्यात वार धुळे : घरासमोर कचरा टाकण्यास मनाई केल्याच्या कारणावरून विटाई (ता. साक्री) येथे चौघांनी मिळून वृद्ध महिलेला मारहाण केली. यावेळी लोखंडी सळीने डोक्यात वार केल्याने रंभाबाई भटू अहिरे (वय ६५) गंभीर जखमी झाल्या. ही घटना बुधवारी (ता. २८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याबाबत रंभाबाई अहिरे यांच्या फिर्यादीनुसार महेश रवींद्र साळुंखे, शामल विजय साळुंखे, तुषार विजय साळुंखे आणि सोनीबाई सावकार साळुंखे (सर्व रा. विटाई, ता. साक्री) यांच्याविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. -- बांधकामाच्या घरातून वायरचे बंडल चोरीला धुळे : चाळीसगाव रोड परिसरातील अविष्कार कॉलनीत बांधकाम सुरू असलेल्या घरातून इलेक्ट्रिक वायरचे चार बंडल चोरट्यांनी लंपास केले. याबाबत मझहर शेख हसन शेख यांनी फिर्याद दिली. शेख हे डॉ. कुरेश शेख यांच्या घराच्या बांधकामस्थळी देखरेखीचे काम करतात. रविवारी सकाळी घरात ठेवलेले इलेक्ट्रिक वायरचे चार बंडल आढळून आले नाहीत. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी घरात प्रवेश करून ते नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात संशयित चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -- वाहनाच्या धडकेत चालकाचा मृत्यू धुळे : मुंबई- आग्रा महामार्गावरील मोहाडी रेल्वे उड्डाणपुलावर मालवाहू वाहनाने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. भरत भटा वाघ (वय ५०, रा. सुराय, ता. शिंदखेडा) हा मालवाहतूक ट्रक (एमएच १८ सीएन ७१०८) मालेगावकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव वेगात चालवत होता. मोहाडी रेल्वे उड्डाणपुलावर त्याने विनोद आवासे यांच्या मालकीच्या ट्रकला (एमएच १८ बीझेड ५०४९) मागून धडक दिली. या अपघातात भरत वाघ याचा मृत्यू झाला. याबाबत विनोद सिताराम आवासे (वय ३९, रा. वासवी, ता. राजपूर, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार मृत भरत वाघ याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू धुळे : बोरविहिर (ता. धुळे) येथील शेतातील तलावात बुडालेल्या अवस्थेत ईश्वर मगन बाविस्कर (वय ४१, रा. पुरमेपाडा, ता. धुळे) आढळून आले. ही घटना शनिवारी (ता. ३१) दुपारी सव्वाएकच्या सुमारास उघडकीस आली. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना पाण्यातून बाहेर काढून जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. - मोहाडी शिवारात प्रौढाचा मृत्यू धुळे : मोहाडी शिवारात धुळे-चाळीसगाव मेमूखाली आल्याने अंबादास वामनराव वाघ (वय ४९, रा. वडजाइ, ता. धुळे) यांचा मृत्यू झाला. बारा ऑक्टोबरला ही घटना घडली. या प्रकरणी शालक शरद बाळकृष्ण मोरे यांच्या माहितीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.