धुळे : टुडे पान २ साठी.. अवतीभवती
--
आज देवगिरी प्रांतीय
क्रीडा महोत्सव
धुळे : अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने देवगिरी प्रांतस्तरीय क्रीडा स्पर्धांचे येथील जिल्हा स्टेडियमवर रविवारी (ता. २५) आयोजन केले आहे. या स्पर्धेत तिरंदाजी, ॲथलेटिक्स, लांब उडी, गोळाफेक या क्रीडा प्रकारांसह १४, २१ आणि ४२ किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेचा समावेश आहे. यात देवगिरी प्रांतातील धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतील सुमारे २०० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख आशुतोष पूरकर यांनी दिली.
--
एकवीरा विद्यालयाचे
क्रीडा स्पर्धेत यश
धुळे : मनपास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत श्री एकवीरा देवी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. १७ वर्षांखालील गटात वैभवी पाटीलने तिहेरी उडीत प्रथम क्रमांक मिळवला. गार्गी बाविस्करने थाळीफेकीत द्वितीय क्रमांक मिळवून विभाग स्तरावर निवड निश्चित केली. तसेच, तिने सायकलिंगमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. ४×१०० रिले स्पर्धेत प्रांजल खैरनार, वैभवी पाटील, तनुश्री पाटील व जान्हवी पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. उंच उडीत कृष्णा पाटीलची विभाग स्तरावर निवड झाली, तर प्रांजल खैरनारने गोळाफेकीत तृतीय क्रमांक मिळवला. १४ वर्षांखालील ४×१०० रिले स्पर्धेत भूषण पाटील, अंशुमन बागले, मनीष पाटील व वेदांत सूर्यवंशी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांसह क्रीडा शिक्षक एन. एस. पाटील, एस. जे. साळुंके यांचे संस्था अध्यक्ष प्रशांत वाघ, सचिव प्रदीप वाघ, मुख्याध्यापिका ए. ए. भदाणे आदीनी कौतुक केले.
--
फोटो : 33414
-
कॉँग्रेसच्या सचिवपदी
गणेश गावित नियुक्त
साक्री : धुळे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी गणेश गावित यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू, असा विश्वास श्री. गावित यांनी व्यक्त केला. या नियुक्तीबद्दल त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार ॲड. गोवाल पाडवी, खासदार डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ यांचे आभार मानले.
--