धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33510
हरणमाळ हिल्स (ता. धुळे) : राज्यस्तरीय शस्त्राँग मार्शल आर्ट्स स्पर्धेत यश संपादन करून विजेतेपद पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांसह अश्विनी देवरे. शेजारी शिक्षक.
--
राज्यस्तरीय शस्त्राँग आर्ट्समध्ये विद्यार्थ्यांची चमक
--
छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी पटकावली पदके
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या सहाव्या राज्यस्तरीय शस्त्राँग मार्शल आर्ट्स स्पर्धेत हरणमाळ हिल्स (ता. धुळे) येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कौशल्याच्या बळावर सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत मुंबई, नागपूर, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर व धुळे या जिल्ह्यांतील नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
-
चुरशीच्या लढतींमध्ये शाळेच्या सुवर्णपदक विजेत्या रूपाली पाडवी, अवनी साळुंके, सोनाक्षी सोनवणे, कनिष्का ढोले, अनुष्का भालेराव, कार्तिक गावीत, कार्तिक साबळे व दिवेश सोनवणे यांनी चमकदार कामगिरी केली. तसेच, रौप्यपदक विजेते कार्तिका पारखे, श्रद्धा शिवदे, राम पाटील, रोनक मगर, भावेश सूर्यवंशी, मुनव्वर बागवान व कार्तिक चौधरी यांनी आपल्या खेळाची छाप पाडली. कांस्यपदक विजेते मयुरी तिवारी, गुंजन भामरे, दीक्षा भामरे, भूमी भामरे, दीपेश खंडिकर, देवेंद्र भोई, तनया पाडवी व कृष्णा पाटील यांनीही यश मिळवून यशाची परंपरा कायम ठेवली. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक हेमराज भामरे, रेश्मा मराठे व राजेश मोरे यांचे मार्गदर्शन झाले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या अश्विनी देवरे, प्राचार्य आशिष काटे, प्रशासकीय अधिकारी नितीन पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पदकविजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.