धुळे टुडे १ साठी...
---
फोटो-NSK26H33304
धुळे : महापालिकेत पथविक्रेता समितीच्या आढावा बैठकीला उपस्थित समिती सदस्य, अधिकारी- कर्मचारी.
---
पथविक्रेता समितीची
मनपात आढावा बैठक
---
नियमावलीबाबत सविस्तर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : शहरातील पथविक्रेता समितीची गुरुवारी (ता. २२) महापालिकेत आढावा बैठक झाली. बैठकीत पथविक्रेत्यांनी नियमाप्रमाणे आपला व्यवसाय करण्याबाबत सदस्यांशी चर्चा झाली.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. केंद्र शासनाने सन २०१४ मध्ये पथविक्रेता अधिनियम प्रसिद्ध केला असून, महाराष्ट्र शासनाने ९ जानेवारी २०१७ रोजी पथविक्रेता योजना व समितीचा मसुदा जाहीर केला होता. याच पार्श्वभूमीवर सन २०२६ चा अंतिम मसुदा मंजूर करण्याच्या दृष्टीने बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पथविक्रेत्यांसाठी योग्य आणि सुटसुटीत नियमावली तयार करून त्यानुसारच विक्रेत्यांनी आपला व्यवसाय करावा, याबाबत बैठकीत उपस्थितांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत समाज विकास अधिकारी मीना सातभाई यांनी पथविक्रेता समितीच्या मसुद्याचे वाचन करून उपस्थितांना माहिती दिली. या आढावा बैठकीस नितीन बंग, जयश्री शहा, खिमजी पटेल, कविता पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत महाले, चंद्रकांत सोरमारे, ज्योती कोळी, अंजुम शहा आदी उपस्थित होते. सुनील सरदार, धम्मदीप सावंत, छाया पाटील, सुनीता निकम यांचे सहकार्य लाभले.