विद्यार्थी गुणगौरव सोहळा

विद्यार्थी गुणगौरव सोहळा
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी...अँकर --- फोटो क्रमांक : 35188 धुळे : मनकर्णिका भवन येथे श्री शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळातर्फे झालेल्या गुणगौरव सोहळ्यात दीपप्रज्वलन करताना मान्यवर. --- संस्कार अन् शिस्तीसाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन आवश्यक सचिन जोशी : धुळ्यात ब्राह्मण मंडळतर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : मुलांवर उत्तम संस्कार घडविण्यासाठी आणि त्यांना योग्य व शिस्तबद्ध मार्ग दाखविण्यासाठी घरामध्ये मोठ्यांचा दरारा असणे गरजेचे आहे. सध्या काळ वेगाने बदलत असून, घरातील मोठ्या व्यक्तींचा असलेला धाक व दरारा दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. जीवनात खऱ्या अर्थाने मोठे होण्यासाठी महान व्यक्तींचे वेळोवेळी मार्गदर्शन घेणे आणि त्यांचे प्रेरणादायी व्याख्यान ऐकणे आवश्यक असून, यातूनच विद्यार्थ्यांची प्रगती साधली जाते, असे प्रतिपादन महावितरणचे उपविभागीय अधिकारी सचिन जोशी यांनी केले. श्री शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारार्थ देवपुरातील मनकर्णिका भवन येथे गुणगौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रविवारी (ता. १५) झालेल्या या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष ॲड. आर. डी. जोशी अध्यक्षस्थानी होते. जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अधिष्ठाता डॉ. नितीन कुलकर्णी यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती होती. डॉ. नितीन कुलकर्णी यांनी समाजविकासासाठी सातत्यपूर्ण संवाद, अभ्यासात सातत्य राखणे आणि कृतज्ञता बाळगण्याबाबत मार्गदर्शन केले. समाजबांधवांच्या सतत बैठका घेतल्या गेल्या पाहिजेत, ज्यामुळे विचारांची देवाणघेवाण होऊन संपूर्ण समाजाला लाभ होईल. तसेच समाजात लाख-दीड लाखाची देणगी देणाऱ्या दानशूर व्यक्तींचे छायाचित्र भवनात लावले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजाने एकसंघ राहावे ॲड. जोशी यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्याची नितांत गरज असल्याचे मनोगतात सांगितले. ब्राह्मण समाजाने एकसंघ राहून एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे. पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. वसुधा पाठक आणि पपिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विजय एन. पाठक यांनी प्रास्ताविक मांडले. विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले. मेघश्याम दीक्षित, प्रकाश जोशी, रमेश जोशी, यादवराव जोशी, धर्मेंद्र पाठक, विनोद जोशी, राजश्री मुळे, सीमा जोशी, वर्षा जोशी, रोहिणी पाठक, सरिता कुलकर्णी, प्रिती जोशी आदींसह कार्यकारिणी सदस्यांनी संयोजन केले.