धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 34114
धुळे : ईकरा खानदेश फाउंडेशनतर्फे झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांसह मान्यवर.
--
धुळ्यातील ९५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
--
ईकरा खानदेश फाउंडेशनतर्फे उपक्रम; पालक मार्गदर्शन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३१ : ईकरा खानदेश फाउंडेशनच्या धुळे युनिटतर्फे येथील हाजी हाकममियाँ हॉलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पालकांना मार्गदर्शन आणि ज्येष्ठांचा सत्कार सोहळा पार पडला. तिलावते कलाम ए पाक व नातने सुरुवात झाली. फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी सलाऊद्दीन नुरी अध्यक्षस्थानी होते. अर्शद इकबाल अहदबेग मिर्झा प्रमुख पाहुणे म्हणून तर जळगावचे सॉफ्ट स्किल ट्रेनर रागिब अहमद अ. नबी उपस्थित मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
-
उपाध्यक्ष कमर अहेमद शेख, सचिव रिझवान जहागीरदार, खजिनदार हाजी बद्रोद्दीन रहीमोदीन शेख, रजियोद्दिन सैय्यद , हाजी शकीलोद्दिन जमिलोद्दिन शेख, हसीनोद्दीन अजीमुद्दीन शेख, इसरार अली कमर अली सैय्यद, हाजी रहीमुद्दीन शेख, हाजी अ. जब्बार शेख व हाजी बशीरोद्दीन उपस्थित होते. सचिव रिझवान जहागीरदार यांनी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारी स्कॉलरशिप, जकातचा निजाम व राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ९५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार झाला. हाजी नुरअली सैय्यद, हाजी जावीदअली सैय्यद, नईमोद्दीन बशीरोद्दीन शेख यांचा सपत्नीक सन्मान झाला. मनपाचे रईसोद्दीन अलीयोद्दीन शेख यांचा निवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.
-
हाजी सलाऊद्दीन नूरी यांनी, आर्थिक कमतरतेमुळे एकही विद्यार्थी शिक्षण सोडणार नाही, त्यासाठी फाउंडेशन मदत करेल, असे आश्वासन दिले. रिझवान शेख व नियाज सर यांनी विद्यार्थ्यांना पालकांचा आदर, मोबाईलपासून दूर राहणे व अभ्यासाचे नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. हाजी अजिजोद्दीन, हाजी मुनाफअली सैय्यद, रईस अहेमद अजीजोद्दीन शेख, मुख्तार शेख, मुबीन मलक, ॲड. मजहर शेख, आफताब अंजुम मलीक, कफील शेख, रईस अहेमद शेख, फराज जाकीर हुसैन सैय्यद, गयासोद्दीन शेख, मुजाहीद शेख, कलीम अली मसुद अली, कलीम शेख, पत्रकार सलीम, ॲड. इम्रान शेख उपस्थित होते. नियाज अहमद यांनी सूत्रसंचालन केले. हाजी सलाऊद्दीन नूरी, कमर शेख, हाजी रहीमोद्दीन, हाजी अ. जब्बार, हाजी बद्रोद्दीन, हाजी बशिरोद्दीन, डॉ. शकिल, नाजिमोद्दीन शेख, सादिक शेख, नासीर शेख, रिजवान शेख, ॲड. हनीफ शेख, अवैस खान, नईम शेख, शहाबोद्दीन शेख, निसार निहाल शेख, मिर्झा फैजबेग, बुरहानोद्दीन अलीयोद्दीन, मिर्झा वाजीद, राहील अक्रम अली सैय्यद आदींनी संयोजन केले.