छत्रपती पब्लिक स्कूल

छत्रपती पब्लिक स्कूल
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.. -- फोटो क्रमांक : 33282 हरणमाळ हिल्स (ता. धुळे) : राज्यस्तरीय शस्त्राँग मार्शल आर्ट्स स्पर्धेत यश संपादन केल्यानंतर चषक उंचावून आनंद साजरा करताना छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलचे पदकविजेते विद्यार्थी. शेजारी मार्गदर्शक शिक्षक, मान्यवर. -- राज्यस्तरीय शस्त्राँग मार्शल आर्ट्समध्ये धुळ्याचा डंका -- छत्रपती पब्लिक स्कूलच्या २५ विद्यार्थ्यांची भरारी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सहाव्या राज्यस्तरीय शस्त्राँग मार्शल आर्ट्स स्पर्धेत हरणमाळ हिल्स (ता. धुळे) येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. चुरशीच्या लढतींमध्ये शाळेतील २५ विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. या स्पर्धेत मुंबई, नागपूर, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. यात उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यात रूपाली पाडवी, अवनी साळुंके, सोनाक्षी सोनवणे, कनिष्का ढोले, अनुष्का भालेराव, कार्तिक गावित, कार्तिक साबळे, दिवेश सोनवणे यांनी सुवर्णपदक, कार्तिका पारखे, श्रद्धा शिवदे, राम पाटील, रोनक मगर, भावेश सूर्यवंशी, मुनव्वर बागवान, कार्तिक चौधरी यांनी रौप्यपदक, तर मयुरी तिवारी, गुंजन भामरे, दीक्षा भामरे, भूमी भामरे, दीपेश खंडिकर, देवेंद्र भोई, तनया पाडवी, कृष्णा पाटील यांनी कांस्यपदक पटकावले. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक हेमराज भामरे, रेश्मा मराठे व राजेश मोरे यांचे मार्गदर्शन झाले. नियमित सराव आणि कठोर परिश्रमांमुळे हे यश साध्य झाले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती सदस्या अश्विनी देवरे, प्राचार्य आशिष काटे, प्रशासकीय अधिकारी नितीन पाटील आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Marathi News Esakal
www.esakal.com