टुडे पान २ साठी...अवतीभवती

टुडे पान २ साठी...अवतीभवती
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी...अवतीभवती --- हस्तीच्या खेळाडूंची विभागस्तरावर मजल धुळे : दोंडाईचास्थित हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचालित हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत यश संपादन करत विभाग स्तरावर प्रवेश मिळविला आहे. जिल्हा क्रीडा विभागामार्फत नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील विकास विद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेचे प्राचार्य आणि जिल्हा सचिव आनंद पवार यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या आणि मुलांच्या संघाने प्रथम स्थान पटकावले, तर १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने तृतीय स्थान मिळवले. या संघात १४ वर्ष मुलींच्या गटातून संजना पावरा, आरती बागूल, मंजू पावरा, आरवी पावरा, खुशी पवार, अंकिता पावरा, श्रेयांशा गावित, राशी पावरा, निकिता पावरा, चंचल पावरा व दिव्या पावरा यांनी सहभाग घेतला. तसेच १४ वर्ष मुलांच्या गटात सिद्धेश्वर धनगर, ऋषिकेश मासुळे, यश बच्छाव, लोकेश गावित, दीपक पाडवी, अर्जुन ठाकरे, केशव मनोहर, आकाश सुल, सुनील तांबे, पुष्कराज करिया, दुर्गेश वाघ व आदेश लकडे यांनी चमकदार कामगिरी केली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक जैन, कार्याध्यक्ष किशोर जैन, चेअरमन कैलास जैन, संचालक मंडळ, प्राचार्या रझिया दाऊदी यांनी खेळाडूंचे कौतुक केले. --- मानगढला व्हावे राष्ट्रीय स्मारक धुळे : राजस्थानमधील मानगढ येथे १९१३ मध्ये गोविंद गुरूंच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘भगत आंदोलना’त इंग्रजांनी वनवासी समुदायाचा मोठा नरसंहार केला होता. या ऐतिहासिक बलिदानाचा गौरव म्हणून मानगढ येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी देवगिरी कल्याण आश्रमाने केली. या मागणीचे निवेदन राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना देण्यात आले. इंग्रजांच्या जुलूम आणि जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधातील या आंदोलनाचा विस्तृत अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग व भारतीय पुरातत्त्व खात्याच्या समितीने यापूर्वीच सादर केला आहे. राष्ट्रपती व पंतप्रधानांनी स्वतः मानगढला भेट दिल्यामुळे केंद्र सरकार निश्चितच उचित स्मारक उभारेल, असा विश्वास देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांत पदाधिकारी इनेश गावित यांनी व्यक्त केला. महेंद्र विसपुते, श्याम पावरा, विजय पवार, रवींद्र डुडवे, गजानन चौधरी व संजय पाटील या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.