धुळे : टुडे पान २ साठी...अवतीभवती
--
फोटो : 34692
धुळे : दिवाळीनिमित्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करताना सुनील बैसाणे.
-
स्वच्छता कर्मचाऱ्यांना
मिठाईचे झाले वाटप
धुळे : दीपावली सणानिमित्त महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत मिठाई वाटप करून दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. प्रभाग दहाचे नगरसेवक ललित आरुजा यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नगरसेवक सुनील बैसाणे, नगरसेविका किरण कुलेवार, नगरसेविका प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सर्व मिठाईचे वाटप झाले. उद्योजक सचिन अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार, प्रकाश पोळ, कृष्णा आरुजा, ऋषिकेश घुडीयाल उपस्थित होते. मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, मुकादम जयकिशन पिवाल, चेतन सोनकांबळे, जय लोहरे यांनी संयोजन केले.
--
रावल इन्स्टिट्यूटचे तिघे
विद्यापीठात प्रथम
धुळे : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मे २०२६ मध्ये घेतलेल्या परीक्षांमध्ये दोंडाईचा येथील स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेच्या जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तीन विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णयश मिळवले. एम. ई. सिव्हिल (स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग) शाखेत वैभव वसंत तांबे, एम. ई. कॉम्प्युटर शाखेत राजन यशवंत साळुंखे, तर बी. ई. मेकॅनिकल शाखेत शेख फैजान शेख अशफाक यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळवून संस्थेच्या मानात भर घातली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, सचिव सी. एन. राजपूत, सहसचिव (विस्तार) आर. टी. गिरासे, सहसचिव डी. एन. जाधव, सामान्य प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे, अभियांत्रिकी प्राचार्य डॉ. डी. एम. पटेल, तंत्रनिकेतन प्राचार्य एम. डी. पाटील, उपप्राचार्य बी. डी. गिरासे व के. डी. सोनार, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी कौतुक केले.
--
फोटो : 34694
संतोषी पिंपळसेची
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
धुळे : सातपुडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी संतोषी पिंपळसे हिने पालघर येथील राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत ४०० मीटर आणि ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाच्या बळावर १८ नोव्हेंबरला शिवपुरी (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुधीरकुमार जाधव, विश्वस्त प्रतिमा जाधव, रोहन जाधव, प्राचार्य एच. वाय. पवार, क्रीडा शिक्षक प्रमोद पाटील आदींनी कौतुक केले.
--
सीए शाखेतर्फे
‘नीतिशास्त्र’ सेमिनार
धुळे : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत धुळे सीए शाखेच्या वतीने शाखा कार्यालय सभागृहात ‘आपले नीतिशास्त्र’ या विषयावर विशेष सेमिनार पार पडले. सीए शाखेच्या अध्यक्षा सीए सोनी सोनार यांनी प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले. सीए शाखेचे माजी अध्यक्ष सीए राजाराम कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी नीतिशास्त्राची तत्त्वे, व्यावसायिक व व्यावहारिकदृष्ट्या त्याची अंमलबजावणी, नीतिशास्त्र पालनाची आवश्यकता तसेच दैनंदिन व्यवसायात नीतिमूल्यांचा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले.
--