(पान ४ ला मेन) रस्त्याचे चित्र टाकणे
राम भदाणे : KPD26B13624
--------
धुळे तालुक्यात पूलांसह रस्त्यांसाठी तेवीस कोटींचा निधी
आमदार राम भदाणे : विकासकामांसाठी दिवाळीचे बंपर गिफ्ट
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ९ : धुळे तालुक्यातील विविध गावांतील पूल बांधकाम आणि रस्ता सुधारणा, मजबुतीकरणासाठी सुमारे २३ कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुल आणि रस्त्यांच्या प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे आमदार राम भदाणे यांनी सांगितले. ऐन दिवाळीत विकासकामांसाठीच्या निधीचे बंपर गिफ्ट दिले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
------
नेर येथील पुलाच्या बांधकामासाठी सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पांझरा नदीला पूर आल्यावर मोठी अडचण निर्माण व्हायची. नेर व इतर गावांतील शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता भक्कम पूल झाल्यावर ही अडचण कायमची दूर होणार आहे. कुसुंब्यातील पुल, धमाणे- न्याहळोद येथील पुल आणि सुट्रेपाडा पुलाच्या मंजुरीमुळे पावसाळ्यातील दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. धुळे ग्रामीणमधील रस्त्यांच्या कामांसाठीही भरीव निधी मिळाला आहे. विश्वनाथ ते नावरा- नावरी रस्त्यामुळे परिसरातील गावांना जोडणी अधिक मजबूत होणार आहे. दरम्यान, ऐन दिवाळीत हा निधी मंजूर झाल्याने ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे.
-----
मंजूर निधी असा (रूपये कोटीत)
नेर गावाजवळील पांझरा पुलासाठी : ९ कोटी
कुसूंबा गावातील पुलासाठी : ३ कोटी
धमाणे- न्याहळोद गावातील पुलासाठी : ३ कोटी
सुट्रेपाडामधील पुलासाठी : ३ कोटी
बेंद्रेपाडा ते सोनेवाडी रस्त्यासाठी : ३ कोटी
विश्वनाथ ते नावरा- नावरी रस्त्यासाठी : २ कोटी