धुळे : मुख्य अंकातील पानासाठी...
--
फोटो क्रमांक : धुळे जिल्हा परिषद लोगो वापरणे.
--
धुळे जिल्हा परिषदेत ६७
शिक्षकांना नियुक्ती आदेश
--
पवित्र पोर्टलद्वारे समुपदेशनाने पार पडली प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : जिल्हा परिषदेच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक पदाच्या पहिल्या टप्प्यातील पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे प्रत्यक्ष शाळेवर पदस्थापना देत नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शाळांवरील शिक्षक भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.
जिल्हा परिषदेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण सेवक पदासाठी प्राप्त झालेल्या यादीतील ६८ उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी सोमवारी (ता. ६) करण्यात आली. या तपासणीअंती ६८ पैकी ६७ उमेदवार पात्र ठरले. जिल्हा परिषद कार्यालयात पार पडलेल्या विशेष समुपदेशन सत्रात या सर्व ६७ पात्र उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या शाळेवर पदस्थापना देण्यात आली. कागदपत्र तपासणी आणि समुपदेशनानंतर लगेचच उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती आदेशही सुपूर्द करण्यात आले. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या मार्गदर्शनात ही संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैभव बाचकर, उपशिक्षणाधिकारी प्रमोद सोनार तसेच चारही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रशासकीय कामकाजात सहाय्यक प्रशासन अधिकारी ज्योती पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी बबिता पटले, लक्ष्मीकांत वाघ, प्रवीण चौधरी, भानुदास पाटील, रवींद्र बोरसे, तुषार दिक्षीत आणि संदीप सोनवणे यांनी सहकार्य केले.
--