सकल आदिवासी कोळी समाजाचा 18 नोव्हेंबरपासून दिल्ली पदयात्रा

सकल आदिवासी कोळी समाजाचा 18 नोव्हेंबरपासून दिल्ली पदयात्रा
Published on: 
कोळी समाजातर्फे धुळे ते दिल्ली पदयात्रा जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. १६ : राज्यातील आदिवासी कोळी समाजाच्या विविध जमातींना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाठी केंद्राने लक्ष घालून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, या मागणीसाठी धुळे ते नवी दिल्ली संसद भवनापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्याचे नेतृत्व गीतांजली कोळी करणार आहेत. बुधवारी (ता.१८) पदयात्रेला सुरुवात होईल. आदिवासी कोळी, ढोर कोळी (२८), टोकरे कोळी (२९) आणि महादेव कोळी, मल्हार कोळी (३०) या समाजाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळविताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी, युवक आणि कुटुंबांना शैक्षणिक, नोकरी, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविताना अडचणी निर्माण होतात. गेल्या अनेक वर्षांपासून कोळी समाज याप्रश्नी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे आता शासनाला अंतिम अल्टिमेटम देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दिल्लीपर्यंत पायी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी दहाला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून गांधी पुतळा, मोठा पूल, दत्तमंदिर चौक, नगाव, देवभाने, सोनगीर आणि नरडाणा मार्गे पदयात्रा पुढे मार्गस्थ होईल. पहिल्या दिवशी सुमारे ३५ किमी अंतर पार करून वर्षी (ता. शिंदखेडा) येथील शनी मंदिर येथे मुक्काम करण्यात येईल. त्यानंतर १९ नोव्हेंबरला उंटावद मार्गे शिरपूरकडे पदयात्रा रवाना होईल समाज बांधवांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन गीतांजली कोळी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.