धुळे : मुख्य अंकातील पानासाठी...
--
फोटो क्रमांक : 31724
वणी (ता. धुळे) : शेतशिवारातील जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलून त्या जागी नवीन १०० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर उपस्थित शेतकरी.
--
वणी शिवारात तत्काळ बसला ट्रान्सफॉर्मर
--
आमदार राम भदाणे यांच्या सूचनेनंतर कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : दुष्काळी परिस्थितीत वणी बुद्रुक (ता. धुळे) येथील शेतशिवारातील जळालेला ट्रान्सफॉर्मर तत्काळ बदलून त्या जागी १०० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला. आमदार राम भदाणे यांनी तात्काळ याबाबत सूचना देत हा प्रश्न मार्गी लावल्याने शेतकऱ्यांच्या बागायती पिके व फळबागा वाचल्या असून, शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
-
वणी शेतशिवारातील ६३ केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मागील आठवड्यात जळाला होता. ऐन पाणी देण्याच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कापूस, भाजीपाला व फळबागा करपण्याची भीती निर्माण झाली होती. या समस्येबाबत शेतकरी संजय पाटील, बनिलाल पाटील, काशीनाथ पाटील, नवल पाटील, बाळू पाटील, बंडू पाटील, किशोर पाटील, जिभाऊ पाटील, त्र्यंबक पाटील आणि सागर माळी आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार भदाणे यांच्याशी संपर्क साधून व्यथा मांडली. आमदार भदाणे यांनी तातडीने दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. केवळ जुन्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती न करता, भविष्यातील गरज विचार करून त्या ठिकाणी थेट ६३ केव्हीए ऐवजी १०० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून बसवून घेतला. यामुळे शेतशिवाराचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.