विविध संघटनांचे धरणे

विविध संघटनांचे धरणे
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.. -- फोटो क्रमांक : 32915 धुळे : मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनास बसलेले विविध संघटनांचे पदाधिकारी. -- ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुकांचा आग्रह -- धुळ्यात विविध संघटनांचे धरणे; मतदार याद्यांतील पारदर्शकतेवर भर सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ : ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता आणावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी क्रांती सेना, संविधान संरक्षण समिती, पुरोगामी विचार मंच आणि समविचारी संघटनांच्या वतीने शुक्रवारी (ता. १६) धुळ्यात धरणे आंदोलन करण्यात आले. जेल रोड येथील क्युमाईन क्लबजवळ आंदोलनानंतर राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. - मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी, देशातील एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात, जातिनिहाय जनगणना करून पारदर्शक मतदार याद्या तयार कराव्यात, तसेच आंदोलक युवक आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांवर योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनात हरिश्चंद्र लोंढे, युवराज करनकाळ, तेजस गोटे, प्रभाकर खंडारे, महेंद्र पाटील, दीपक सोनवणे, भय्या पारेराव, योगेश जगताप, भिवसन अहिरे, बाबा हातेकर, नंदू एलमामे, भिका नेरकर, सोमेश्वर साबळे, नरेंद्र परदेशी, अतुल सोनवणे, भाई नगराळे, रणजित पाटील, कुणाल कानडे, ॲड. विशाल साबळे, पितांबर महाले, किशोर वाकळे, रमेश श्रीखंडे आणि अजित राजपूत यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com