जिल्ह्याचा क्रिकेट संघ जाहीर

जिल्ह्याचा क्रिकेट संघ जाहीर
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी... --- फोटो क्रमांक : 35020 - सार्थक पाटील --- जिल्ह्याचा १४ वर्षांखालील क्रिकेट संघ जाहीर कुंडाणेत रंगणार स्पर्धा; सार्थक पाटीलकडे कर्णधारपदाची धुरा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने होणाऱ्या १४ वर्षांखालील आमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. या संघास सार्थक भूपेश पाटील याचे कर्णधारपद मिळाले आहे. ही स्पर्धा १३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत कुंडाणे (ता. धुळे) एमसीए क्रिकेट मैदान, तसेच नाशिक येथील मैदानावर खेळवली जाईल. स्पर्धेच्या ‘ब’ गटात धुळे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, नांदेड, पूर्व विभाग, ॲम्बिशन्स क्रिकेट क्लब (पुणे) आणि सीएनए क्रिकेट क्लब (पुणे) हे संघ आहेत. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संघाची निवड केली जाणार आहे. धुळे संघाचे सामने १३ ते १४ नोव्हेंबर दरम्यान सीएनए क्रिकेट क्लब (पुणे) विरुद्ध धुळे येथे, १६ ते १७ नोव्हेंबर रत्नागिरी विरुद्ध धुळे, २२ ते २३ नोव्हेंबर पूर्व विभागाविरुद्ध धुळे, २५ ते २६ नोव्हेंबर ॲम्बिशन्स क्रिकेट क्लब (पुणे) विरुद्ध नाशिक, २८ ते २९ नोव्हेंबर रायगड विरुद्ध नाशिक आणि १ ते २ डिसेंबर रोजी नांदेड विरुद्ध धुळे येथे होतील. उत्तर विभागाच्या संघात जिल्ह्यातील अंश प्रवीण खळगे, ऋतुराज संदीप पाटील, सचिन रावण पावरा आणि आदित्य ललित पाटील या चार खेळाडूंची निवड झाली असून, त्यांचे सामने पुणे येथे होणार आहेत. संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, सल्लागार राजवर्धन कदमबांडे यांनी अभिनंदन केले. धुळे जिल्हा संघ सार्थक भूपेश पाटील (कर्णधार), दक्ष विजय वाघ, शिवम संदीप गुजराथी, निरंजन खेतमल चौरे, आराध्य दिनेश बोरसे, देवांशू नीलेश कोळी, सदिम साजिद शहा, आरव दीपक बिडकर, आराध्या प्रशांत देवरे, मलय अनिकेत सेठी, आराध्या सचिन कुलकर्णी, वेदांत गोरख पाटील, भूपेश पाटील, तुषार महेंद्र कोळेकर, यश दिनेश पाठक. मुख्य प्रशिक्षक फिरोज शेख, सहाय्यक प्रशिक्षक आनंद जगताप आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.