धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H33766
धुळे : फॉर्म सातच्या गैरवापर प्रकरणाच्या चौकशीसह कारवाईच्या मागणीचे निवेदन मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
---
फॉर्म सातच्या गैरवापरप्रकरणी गुन्हे दाखल करा
---
राष्ट्रवादी काँग्रेस; वैध मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २८ : शहर विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक भागांतील वैध मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी भाजपच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून फॉर्म क्रमांक सातचा गैरवापर होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली. मागणीचे निवेदन सोमवारी (ता.२६) मतदार नोंदणी अधिकारी किशोर कदम यांना दिले.
----------
धुळे महापालिकेतील शहर विकास आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक शाहबाज शाह यांनी सांगितले, की विशिष्ट समुदायातील मतदारांना लक्ष्य करून ते संबंधित पत्त्यावर राहत नाहीत, हयात नाहीत किंवा बोगस मतदार आहेत, असे खोटे दावे करत सामूहिकरीत्या फॉर्म क्रमांक सात सादर केले जात आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत प्राप्त झालेल्या फॉर्मची केंद्रनिहाय माहिती द्यावी, प्रत्येक प्रकरणात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) गृहभेट घेऊन खातरजमा करावी आणि संबंधित मतदाराला बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय नाव वगळू नये अशी मागणी केल्याचे श्री. शाह म्हणाले. खोटी माहिती किंवा बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे अर्ज सादर करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, असेही म्हटले आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिले.
या वेळी डॉ. सर्फराज अन्सारी, मतीन पठाण, रफीक शाह, इरफान अन्सारी, सादिक शेख, रफिक शेख, अकील अन्सारी, कांतीलाल दाळवाले, दीपा नाईक, तोहीर खान, समीर खान, कलीम अन्सारी, उत्कर्ष जिरेकर आदींनी मागणीचे निवेदन दिले.
---