धुळे : टुडे १ साठी...मेन
--
लोगो छायाचित्र घ्यावे : पाण्याचा थेंब
--
पाणीटंचाईबाबत १२ कोटींचा आराखडा
-
ऑक्टोबर ते जूनसाठी ८६७ उपाययोजना; ४३२ गावे, ५३६ वाड्यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : दुष्काळीस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पेयजल टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. टंचाईच्या काळात ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी १२ कोटी ४५ लाख ८७ हजार रुपये खर्चाचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा अंतिम करण्यात आला आहे. या आराखड्यात जिल्ह्यातील ४३२ गावे आणि ५३६ वाड्यांचा समावेश असून, ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत ८६७ विविध उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
चालू वर्षात जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १५.९४ टक्के कमी पाऊस झाला. या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे राज्य शासनाने जिल्ह्यातील चारही तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या काळात तब्बल ४५६ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय आराखडे एकत्र करून जिल्ह्याचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला आहे.
-
काटेकोर नियोजनावर भर
संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात दर आठवड्याला आढावा बैठक घेतली जात आहे. उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करणे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण करणे आणि टंचाई निवारणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील गावांची प्रत्यक्ष पाहणी करून गावनिहाय उपाययोजना राबवल्या जात आहेत. सौरऊर्जेवर चालणाऱ्या ड्युअल पंपाच्या नळांना तोट्या बसवणे, पाणी गळती रोखणे, रिचार्ज शाफ्ट, नाला खोलीकरण आणि गॅबियन बंधारे बांधण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. तसेच, सार्वजनिक जलस्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी अनधिकृत बोअरवेल खोदण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
-
१४-१
...चौकट...
१४-१
उपाययोजनांचा तालुकानिहाय आराखडा
* साक्री तालुका : सर्वाधिक ४१४ उपाययोजना प्रस्तावित. खर्च : ३ कोटी ७ लाख ८२ हजार. (३४६ गावे व १३ वाड्यांत विहीर अधिग्रहण, १३ गावांत विहीर खोलीकरण/गाळ काढणे, ३९ गावांत टँकर).
* धुळे तालुका : ९६ उपाययोजनांवर ३ कोटी २५ लाख ६९ हजार खर्च अपेक्षित. (७४ गावांत विहीर अधिग्रहण, २२ गावांत टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा).
* शिरपूर तालुका : २२७ उपाययोजनांसाठी १ कोटी २२ लाख ५८ हजार प्रस्तावित. (१९२ गावांमध्ये विहीर अधिग्रहणाची प्रमुख उपाययोजना).
* शिंदखेडा तालुका : १३० उपाययोजनांवर ४ कोटी ८९ लाख ७८ हजार खर्च होणार. (२ गावांत नवीन विंधन विहीर, २ गावे व ३५ वाड्यांत नळ योजना दुरुस्ती, १०६ गावे व ५ वाड्यांत विहीर अधिग्रहण, १३ गावांत टँकर).