धुळे टुडे २ साठी मेन...चित्र टाकणे
---
धुळ्यासह परिसरात हळूहळू थंडीची चाहूल!
---
किमान तापमान १२.८ अंशांवर; कमाल तापमानाचा पारा मात्र ३३-३४ वर कायम
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : गेल्या काही दिवसांपासून धुळे शहर व परिसरातील कमाल तापमानात घट होत असून हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे. १९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हवामानात लक्षणीय बदल नोंदवले गेले आहेत.
कृषी महाविद्यालयाच्या नोंदीनुसार १९ ऑक्टोबरला ३६.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले तर ऑक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला किमान तापमानाचा पारा खाली आल्याचे अनुभवायला मिळाले. विशेषतः २८ ऑक्टोबरला धुळे शहराचे किमान तापमान १२.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले तर ७ नोव्हेंबरलादेखील किमान तापमान १२.४ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आल्याने वातावरणात गारवा जाणवला.
कमाल तापमानाची स्थिती
१९ ऑक्टोबरला सर्वाधिक ३६.५ अंश सेल्सिअस तर ३१ ऑक्टोबर व २ नोव्हेंबरला ३२.० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले गेले. १९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यानची तापमानाची आकडेवारी पाहता कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यानच पाहायला मिळाले. त्यातही बहुतांश दिवस ३४ अंश सेल्सिअस तापमान राहिले. त्यामुळे दिवसा थंडीचा तसा मागमुस जाणवला नाही. गेल्या दोन- तीन दिवसांपासून पहाटे आणि सकाळी मात्र गारवा जाणवत आहे.
किमान तापमानाची स्थिती
ऑक्टोबरच्या उत्तरार्धात आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान १२ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले. यात २८ ऑक्टोबरला १२.८ अंश आणि ७ नोव्हेंबरला १२.४ अंश सेल्सिअस हे सर्वात कमी तापमान राहिले. दरम्यान, या संपूर्ण कालावधीत सकाळी हवामानातील आर्द्रता ८८ ते ९२ टक्क्यांच्या दरम्यान उच्चांकी राहिली तर दुपारच्या वेळी ती २० ते ४८ टक्क्यांच्या दरम्यान नोंदवली गेली. गेल्या १९-२० दिवसांतील किमान तापमानाची स्थिती पाहता किमान तापमानाचा पारा १८-१९ अंश सेल्सिअसवरुन घसरत शनिवारी (ता. ७) १२.४ अंशापर्यंत खाली आला आहे. दुसरीकडे कमाल तापमानाचा पारा मात्र ३४ अंश सेल्सिअसवर स्थिरावल्याचे दिसते. कमाल तापमानचा पारा कायम असला तरी किमान तापमान खाली आल्याने हिवाळ्याची चाहुल हळूहळू लागत असल्याचे दिसते. अर्थात, निसर्गापुढे सारेच तर्क-वितर्क फोल ठरतात. त्यामुळे थंडी वाढेल की उकाडा कायम राहिल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने समस्यांचे डोंगर उभे आहेत. आता किमान चांगल्या थंडीची अपेक्षा मात्र असणार आहे.
मागील पंधरा दिवसांचे तापमान असे
तारीख...कमाल...किमान (अंश सेल्सिअसमध्ये)
२४ ऑक्टोबर ३४.५ १८.०
२५ ऑक्टोबर ३४.० १४.५
२६ ऑक्टोबर ३५.० १३.०
२६ ऑक्टोबर ३५.० १३.०
२८ ऑक्टोबर ३४.० १२.८
२९ ऑक्टोबर ३३.० १६.२
३० ऑक्टोबर ३३.० १६.६
३१ ऑक्टोबर ३२.० १६.८
०१ नोव्हेंबर ३३.० १६.६
०२ नोव्हेंबर ३२.० १८.६
०३ नोव्हेंबर ३३.६ १८.२
०४ नोव्हेंबर ३४.० १५.०
०५ नोव्हेंबर ३४.४ १५.५
०६ नोव्हेंबर ३४.८ १५.५
०७ नोव्हेंबर ३४.० १२.४
---