महिला सदन कार्यक्रम

महिला सदन कार्यक्रम
Published on: 
धुळे ः टुडे २ साठी -- महिला सदनतर्फे विविध स्पर्धा - पारंपरिक स्पर्धांमुळे रंगत; पारितोषिकांचे वितरण सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ : येथील महिला सदनतर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध पारंपरिक स्पर्धा झाल्या. वीणा चौधरी अध्यक्षस्थानी होत्या. चित्रा अमृतकर प्रमुख पाहुण्या होत्या. स्पर्धेनंतर उपस्थितांनी टिपऱ्या, गरब्याचा आनंद घेतला. सचिव शारदा धांडे, ज्योती भावसार, विद्या खैरनार, सुमन जडे यांचा सत्कार झाला. अध्यक्षा चौधरी, सचिव धांडे, सहसचिव अमिता झेंडे, श्रीमती अमृतकर आदींच्या हस्ते गुलाबाईचे पूजन झाले. अध्यक्षा चौधरी यांनी महिला सदनतर्फे होणारे कार्यक्रम, जात्यावरील गाणी, ओव्या, गुलाबाईची गाणी, जुने बैठे खेळ व वेषभूषाद्वारे जुन्या आठवणींना उजाळा देणे हा संस्थेचा उद्देश असल्याचे सांगितले. या उद्देशाला अनुसरून यावेळी सागर गोट्या स्पर्धा तसेच नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील देवींची मंदिरे व जागा ओळखणे ही स्पर्धा घेण्यात आली. श्रीमती अमृतकर यांनी दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे शास्त्रीय कारण व माहिती विशद केली. नंतर दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांना अध्यक्षा चौधरी यांच्यातर्फे दिवाळीला साजेशी पारितोषिके देण्यात आली. ती अशी : सागरगोटे स्पर्धा- प्रथम क्रमांक हर्षा कुळकर्णी, द्वितीय क्रमांक माधुरी बडगुजर, तृतीय क्रमांक मिना जोशी, उत्तेजनार्थ- मिताली क्षीरे, मंदिरांची जागा शोधणे स्पर्धा- प्रथम क्रमांक मिना जोशी, द्वितीय क्रमांक सुषमा याज्ञिक, तृतीय क्रमांक आरती महाले, उत्तेजनार्थ जयश्री कापडी. तसेच पुष्पलता देशमुख, मनीषा ठाकरे, सविता बहाळकर, सुमन मिस्त्री, मंगला बागुल, सरिता खैरनार, हिरा खंदककर, सुनंदा मौने, नीता रनाळकर, मानसी खिरे, दीपा वानखेडे, शीला चौधरी, वंदना मडीकर, मंदा चौधरी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.