धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- नोट दिल्याचा राग; तरुणाला मारहाण धुळे : नरव्हाळ (ता. धुळे) येथे तमाशादरम्यान नर्तकीला शंभर रुपयांची नोट बक्षीस दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला रस्त्यात अडवून दोघांनी मारहाण केली. या घटनेत नरेश आनंदा भामरे (वय २२) गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रात्री तमाशा सुरू असताना नरेश याने नर्तकीला शंभर रुपयांची नोट दिली. याचा राग आल्याने संदीप सुकदेव मोरे आणि विशाल (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्याशी त्याचा वाद झाला. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास नरेश घरी जात असताना दोघांनी त्याला रस्त्यात अडवून दमदाटी करीत मारहाण केली. याप्रकरणी नरेश भामरे यांच्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - जुन्या वादातून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न धुळे : कलमाडी (ता. शिंदखेडा) येथे जुन्या वादातून विनोद रमेश पाटील (वय ४०) यांच्यावर हल्ला करून गळा दाबत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (ता. २९) सायंकाळी घडली. विनोद यांच्या मदतीला धावलेल्या भावाला आणि चुलत भावालाही मारहाण करून धमकी देण्यात आली. विनोद यांच्या भावाबाबत काही जणांना संशय असल्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विजेंद्र छबीलाल पाटील, सोनू झालसे, ज्ञानेश्वर पितांबर पाटील ऊर्फ वकील, गौरव चतुर पाटील, राजेंद्र शांताराम पाटील यांच्याविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - मद्यधुंद धिंगाणा; दोघांविरुद्ध गुन्हा धुळे : मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करत शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अबुझर मोहम्मद सुलेमान अन्सारी (वय ३७, रा. मोहन बाबानगर, मालेगाव, जि. नाशिक) आणि नईम खान मोहम्मद अब्दुल खान (वय २७, रा. गढया, देवरिया, उत्तर प्रदेश, ह. मु. चाळीसगाव चौफुलीजवळ, धुळे) हे चौदा ऑक्टोबरला रात्री नऊच्या सुमारास यशवंत कृषी महाविद्यालयाजवळील मोहाडी उड्डाणपुलाखालील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करताना आढळले. पोलिस कर्मचारी अतिक रफीक शेख यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. - कौटुंबिक वादातून दांपत्याला मारहाण धुळे : मुलगा आणि सुनेतील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या वृद्ध दांपत्यासह मध्यस्थी करणार्‍या मुलीलाही मारहाण झाल्याची घटना धमनार (ता. साक्री) येथे घडली. या प्रकरणी रखमाबाई आनंदा वाघ (वय ७०) यांच्या फिर्यादीनुसार मुलगा, सून आणि अन्य दोघांविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेरा ऑक्टोबरला सकाळी पावणेआठच्या सुमारास आनंदा वाघ हे मुलगा रवींद्र आणि सून सुनीताबाई यांच्यातील भांडण सोडविण्यासाठी गेले. याचा राग आल्याने संशयितांनी वृद्ध दांपत्याला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलगी भटाबाई अशोक कुवर हिलाही मारहाण झाली. तसेच काठीने केलेल्या मारहाणीत वृद्ध दांपत्याला दुखापत झाली. या प्रकरणी कुणाल रवींद्र वाघ, दीपाली रवींद्र वाघ, सुनीताबाई रवींद्र वाघ यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार धुळे : कोंडाईबारी (ता. साक्री) परिसरात महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अमित अशोक गांगुर्डे (रा. धर्मपूर, गुजरात) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सोबती अक्षय नारायण माळी (रा. चाळीसगाव) जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.