जिल्हास्तरीय युवा महोत्सव

जिल्हास्तरीय युवा महोत्सव
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी... -- धुळ्यात २४ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव -- सुप्तगुणांना मिळणार व्यासपीठ; स्थानिक कलाकारांमध्ये उत्साह -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच संस्कृती व परंपरांचे जतन करून त्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव मिळावा या उद्देशाने जिल्ह्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सव होत आहे. शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आदेशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि एसएसव्हीपीएस बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यातर्फे मंगळवारी (ता. २४) हा महोत्सव होणार आहे. - या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कवितालेखन या स्पर्धांचा समावेश आहे. यात १५ ते २९ वयोगटातील तरुण-तरुणी सहभागी होऊ शकतात. महोत्सवात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके, प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रावीण्यप्राप्त कलाकार व संघांना विभागस्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर कला सादरीकरणाची संधी मिळणार आहे. प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी देवपूर परिसरातील वाडी-भोकर रोडवरील जिल्हा क्रीडासंकुलातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे क्रीडा अधिकारी रेखा पाटील आणि सहाय्यक राज्य संघटक श्रीधर कोठावदे यांच्याशी संपर्क साधवा. विहित नमुन्यातील अर्ज व ओळखपत्र शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी सहापर्यंत कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांनी केले आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.