मनमाड- अनकवाडे शिवारात पेट्रोल-डिझेल चोरीसंबंधीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई- मनमाड- बीजवासन या उच्चदाब इंधनवाहिनीला छिद्र पडून अनधिकृतरीत्या इंधन वळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.