तुमच्या खात्यातून अतिरेक्यांना पैशांचा पुरवठा

तुमच्या खात्यातून अतिरेक्यांना पैशांचा पुरवठा
Published on: 
(एआय चित्र वापरावे) --- ‘तुमच्या खात्यातून अतिरेक्यांना पैशांचा पुरवठा’ निवृत्त प्राध्यापकास भीती घालून ‘डिजिटल ॲरेस्ट’; ५ लाखांची फसवणूक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : ‘तुमच्या मोबाईल क्रमांकावरून महिलांना अश्लील पाठविण्यासह तुमच्या बँक खात्यातून अतिरेक्यांना पैसे गेल्याने तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात येत आहे’, असे धमकावून निवृत्त प्राध्यापक विजयसिंग रामकृष्ण पवार (वय ७२, रा. पाचोरा) यांची ५ लाख २० हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. ही घटना २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान घडली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा येथील निवृत्त प्राध्यापक विजयसिंग पवार यांना २६ सप्टेंबरला अनोळखी क्रमांकावरून फोन आला व कुलाबा पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून तुम्ही महिलांना अश्लिल मॅसेज पाठविल्याची तक्रार असल्याचे सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात दुसऱ्या क्रमांकावरुन पुन्हा कॉल आला. त्याने नाशिक पंचवटी पोलिस ठाण्यात तुमच्याविरुद्ध तक्रार असून तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ करत असल्याचे सांगत कॉल कट केला. तिसऱ्या क्रमांकावरुन विजयसिंग पवार यांना व्हिडीओ कॉल आला. पोलिसाच्या वेशात असलेल्यांनी ‘तुमचे अतिरेक्यांशी संबंध असून तुमच्या बँक खात्यातून अनेक अतिरेक्यांना पैसे गेले आहे. तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे. तसे होऊ द्यायचे नसल्यास ५ लाख २० हजार रुपये पाठवा, असे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या पवार यांनी ५ लाख २० हजार रुपये पाठविले. चौकट सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पैसे पाठविल्यानंतर पवार यांनी तिघांना वेळोवेळी कॉल केले. परंतु त्यांचे मोबाईल बंद येत असल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी विजयसिंग पवार यांनी रविवारी (ता. ११) सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com