Zilla Parishad schools
sakal
नाशिक: जीव धोक्यात घालून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अखेर राज्य सरकारला जाग आली आहे. जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील मोडकळीस आलेल्या व धोकादायक ठरलेल्या शाळा इमारती व वर्गखोल्या तातडीने पाडण्याबाबत ग्रामविकास विभागाने कठोर व स्पष्ट आदेश जारी केले आहेत. शाळांच्या जीर्ण अवस्थेवरून सातत्याने होणाऱ्या चौफेर टीकेनंतर आणि माध्यमांतून येणाऱ्या बातम्यांनंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.