फोटो २ कॉ
VNI26B13068
दिंडोरी - दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना सभापती प्रशांत कड..
------------
३६-४
शेतकऱ्यांसह सर्व घटकांच्या हितास प्राधान्य
-----------
प्रशांत कड ः दिंडोरी बाजार समितीच्या वार्षिक सभेत विविध विषयांना मंजुरी
-----------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.२ : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाबरोबरच शेतकरी, व्यापारी, अडते तसेच बाजाराशी संबंधित सर्व घटकांच्या हिताचा समतोल साधून पारदर्शक व प्रभावी कामकाज करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सभापती प्रशांत कड यांनी केले.
-------------
बाजार समितीची वार्षिक सभा सभापती कड यांच्या अध्यक्षतेखाली नवीन मार्केट यार्ड येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. मागील आर्थिक वर्षातील बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेताना शेतकरी व व्यापारी हिताच्या विविध विषयांवर चर्चा झाली. सभेच्या प्रारंभी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली. वार्षिक आर्थिक ताळेबंद, जमा-खर्चाचा तपशील आणि लेखापरीक्षण अहवाल यावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
१६-१
शेतमाल विक्रीसाठी सुविधा
मुख्य बाजार आवारासह उपबाजार आवारातील उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, कामकाज अधिक प्रभावी करण्याबाबत विविध सूचना मांडण्यात आल्या. शेतमालाच्या लिलावाबाबतही चर्चा झाली. भुसार मालाची खरेदी-विक्री तसेच टोमॅटो व कांदा खरेदी सुरू करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शेतमालाला योग्य व पारदर्शक भाव मिळावा, यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला.
बाजार समितीच्या विकासासोबतच शेतकरी, व्यापारी, अडते व बाजाराशी संबंधित इतर घटकांच्या हिताचा समतोल साधून निर्णय घेण्याची भूमिका मांडण्यात आली. समितीच्या विविध विकासकामांना गती देणे, शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि बाजारपेठेतील व्यवहार अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार करण्यात आला.
खासदार भास्कर भगरे, गणपत पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, सुरेश डोखळे, प्रकाश शिंदे, विश्वासराव देशमुख, कवी संदीप जगताप, वसंत थेटे, विठ्ठल अपसुंदे, गोपीनाथ पाटील, उपसभापती दत्तूभाऊ भेरे, संचालक कैलास मवाळ, योगेश बर्डे, गंगाधर निखाडे, नरेंद्र जाधव, प्रवीण जाधव, श्यामराव बोडके, नंदलाल चोपडा, प्रभारी सचिव जयेश नाठे, रवींद्र गणोरे आदींसह संचालक मंडळ, बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सचिव जयेश नाठे यांनी वाचन केले. शाम हिरे यांनी आभार मानले.
-----------