पान-२ मेन करणे--चित्र वापरणे
----------------
मागणीत वाढ, सतत ट्रीपमुळे वीजपुरवठा विस्कळीत
----------
दिंडोरी तालुका ः नागरिक, शेतकरी व व्यावसायिक त्रस्त; तांत्रिक बिघाडामुळे महावितरणची तारेवरची कसरत
------------
संदीप मोगल ःसकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता.८ ः दिंडोरी तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे सर्वच स्तरातून वाढलेल्या मागणीमुळे विजेची उपलब्धता व पुरवठा याचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. ओव्हरलोडच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून तासनतास वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
-----------------
तीव्र उष्णतेमुळे पंखे, एसी व कुलरचा वापर कमालीचा वाढला आहे. शेतीसाठी विहिरी व बोअरवेलवरून पाणी उपसण्यासाठी विद्युतपंपांचा वापर वाढला आहे. याशिवाय औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील वाढत्या विजेच्या मागणीमुळे वीज वितरण कंपनीची (महावितरण) मोठी तारेवरची कसरत होत आहे. एकीकडे ग्राहकांकडील थकबाकीचे प्रमाण वाढले असताना, दुसरीकडे अखंडित विजेची मागणी केली जात आहे.
१६-१
दिंडोरी - वणी वाहिनी कालबाह्य
दिंडोरी ते वणी या १८ किलोमीटर अंतरावरील मुख्य विद्युत वाहिनी कालबाह्य झाली आहे. रात्री-अपरात्री या वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होतो. हा बिघाड शोधून तो पूर्ववत करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी कसोटी लागते.
१६-१ चौकट करणे
असे आहे वीज वितरणाचे जाळे
दिंडोरी १३३ केव्ही केंद्र : येथून मुख्य वाहिनीद्वारे वणी शहर व ग्रामीण भागाला पुरवठा होतो.
वणी ३३ किलोवॉटचे उपकेंद्र : या केंद्रांतर्गत १३ फिडर्सद्वारे (वणी, मावडी, तळेगाव, तिसगाव, पांडाणे, नांदुरी, चंडिकापूर, फोपशी, ३६ गाव पाणीपुरवठा योजना, ओझरखेड, सगुणा व इतर दोन) वीज दिली जाते.
पिंप्री ५ एमव्ही उपकेंद्र : येथून पिंप्री, माळे, चौसाळे व एक्सप्रेस लाईनला वीजपुरवठा केला जातो.
-----------------
२२० केव्ही केंद्र सुरू, समस्या कायम!
देवसाने येथे पाठपुरावा करून २२० किलोवॉट क्षमतेचे उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील कोशिंबे, पिंपरी अंचला व परिसराची समस्या सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होऊनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. या केंद्रातून कमी व्होल्टेजने वीज येत असल्याने समस्या कायम असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
१६-१
थकबाकी वसुलीत दुजाभाव?
सामान्य ग्राहकांचे एका महिन्याचे बिल थकले तरी वीज कनेक्शन तत्काळ कापले जाते. मात्र, अनेक महिने थकबाकी असणाऱ्या बड्या थकबाकीदारांवर वरिष्ठ अधिकारी ‘मेहेरनजर’ दाखवत असल्याचा आरोप होत आहे. या दुजाभावाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दसरा आणि दिवाळी असे एकापाठोपाठ एक मोठे सण येत आहेत. या पार्श्वभूमीवर किमान सणासुदीच्या दिवसांत तरी महावितरणने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
---------------
कोट
विजेचा वापर क्षमतेपेक्षा जास्त झाल्यावर १३३ केव्ही केंद्रावर ताण येऊन सिस्टीम आपोआप ट्रिप होते. पारेषणच्या वाहिन्यांमध्ये वारंवार होणारे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यावर वीजपुरवठा सुरळीत होईल.
- नीलेश नागरे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण.
-----------