दिंडोरीत ५ ऑक्टोबरला राष्ट्रवादीकडून तीव्र रास्ता रोको शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व सर्वसामान्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन; विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार

दिंडोरीत ५ ऑक्टोबरला राष्ट्रवादीकडून तीव्र रास्ता रोको शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व सर्वसामान्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन; विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार
Published on: 
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज दिंडोरीत रास्ता रोको सकाळ वृत्तसेवा वणी, ता. ३ : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक व आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे सोमवारी (ता. ५) सकाळी दहाला छत्रपती शिवाजी महाराज चौक, पालखेड चौफुली, दिंडोरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक, आंबेडकरी व आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये यूरिया व डी. ए. पी. खतांचा तुटवडा तसेच काळाबाजार व ऑनलाइन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करणे, शेतीसाठी दिवसाचे आठ तास नियमित वीजपुरवठा करणे, खड्डेमय व खराब ग्रामीण तसेच मुख्य रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व डांबरीकरण करणे, दिंडोरीच्या हक्काचे धरणातील पाणी तालुक्यासाठी आरक्षित करणे आणि कालव्यांची दुरुस्ती करून शेतीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविणे, यांचा समावेश आहे. तसेच आदिवासी आश्रमशाळांमधील दुरवस्था, निकृष्ट जेवण, आदिवासी भाग व आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे, वनपट्टे, घरकुल, रेशन व जात पडताळणीचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. बिरसा मुंडा योजनेंतर्गत आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी, अशीही मागणी आहे. दरम्यान, संबंधित मागण्यांवर आठ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com