Grapes
sakal
दिंडोरी: वाढती थंडी, ढगाळ हवामान, दुपारची कडक ऊन अशा सततच्या बदलत्या वातावरणामुळे द्राक्षबागांवर पुन्हा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. ढगाळ हवामानामुळे फुलोऱ्यात असलेल्या द्राक्ष घडातील मण्यांचे गळतीचे प्रमाण वाढले असून यामुळे बागायतदार चिंतेत आहेत.