नाशिक- जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने निर्धारित केलेला तांत्रिक लक्ष्यांक गाठत दिंडोरी तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. त्यापाठोपाठ देवळा व मालेगाव तालुक्यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. पशुसंवर्धन विभागातर्फे या तिन्ही तालुक्यांतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक गौरव करण्यात आला.