लखमापूर: दिंडोरी येथील महावितरणचे उपविभागीय कार्यालयाची इमारत अक्षरशः मृत्यूच्या छायेत असून, केवळ नियतीच्या भरवशावरच कामकाज सुरू आहे. सिमेंट उखडलेले, लोखंडी सळ्या बाहेर आलेल्या, भेगांनी जीर्ण झालेल्या या इमारतीत दररोज अधिकारी, कर्मचारी आणि शेकडो ग्राहक जीव मुठीत धरून वावरत आहेत. कोणतीही दुर्घटना घडण्याआधी ताबडतोब या कार्यालयाचे स्थलांतर किंवा नूतनीकरण गरजेचे आहे.