पान-२
DNR26B14677 ः भगवान मथुरे
३६-२
नवरात्रोत्सव शांततेत
पार पडावा ः मथुरे
-----------------
गरबा नृत्यावेळी विशेष काळजी घ्या
-------------
सकाळ वृत्तसेवा
दिंडोरी, ता.८ ः दिंडोरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा असे आवाहन येथील पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले. तालुक्यातील सर्व नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते आदींच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पांडुरंग गणोरे होते. सुरवातीला गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
श्री. मथुरे पुढे म्हणाले,‘ नवरात्रोत्सव साजरा करताना सर्वांनी पोलिस खात्याची प्रथम परवानगी घेणे बंधनकारक आहे. जिथे देवी मूर्ती बसविण्यात येणार आहे, त्या जागेची निवड करताना रहदारीसाठी अडथळा निर्माण होणार नाही याची सर्व मंडळांनी काळजी घ्यावी. सीसीटीही कॅमेरे बसवावेत, सर्वांनी वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे. डिजे वापरण्यासाठी परवानगी नाही. आबालवृद, लहान मुले यांची काळजी घ्यावी, गरबानृत्य करताना महिलांची विशेष काळजी घ्यावी, यासाठी प्रत्येक मंडळाने स्वयंसेवक नेमावेत, वर्गणी जमा करताना सक्ती करू नये, उत्सवाला गालबोट लागणार नाही याची प्रत्येक मंडळाने काळजी घ्यावी. संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांची संपर्क साधावा. या काळात प्रत्येक मंडळाजवळ साध्या गणवेशात पोलिसांची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृष्णा भोये यांनी आभार मानले.
----------------