लखमापूर- अपघातग्रस्त, चोरीची आणि इतर गुन्ह्यांत जप्त केलेली अनेक वाहने गेल्या काही वर्षांपासून पोलिस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. पोलिसांकडून वेळोवेळी आवाहन करूनही मूळ मालकांनी या वाहनांची जबाबदारी स्वीकारलेली नाही..दिंडोरी पोलिस स्थानकाच्या आवारात गेल्या अनेक वर्षापासून अपघातग्रस्त, चोरीची व विविध गुन्ह्यांतील १०० पेक्षा जास्त वाहने जमा आहेत. संबंधित वाहनमालकांनी आवश्यक कागदपत्रांसह ओळख पटवून आपापली वाहने घेऊन जाणे अपेक्षित आहे. जप्त केलेली वाहने परत नेण्यासाठी मूळ मालकांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. काही प्रकरणांमध्ये न्यायालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वाहने मूळ मालकांना देण्यात येतात. अन्यथा या जप्त केलेल्या वाहनांचा न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार पुढे लिलाव करावा लागतो..पोलिस ठाण्याच्या इमारतीत पोलिसांनाच विविध विभागांचे कामकाज करण्यास पुरेशी जागा उपलब्ध नसताना इमारतीच्या परिसरातील मोकळ्या जागा या जप्त वाहनांनी व्यापल्याचे दिसून येते. त्यामुळे जप्त वाहने कुठे ठेवणार, असा प्रश्न पोलिसांना पडतो. या सर्व वाहनांची पोलिस दप्तरी नोंद केली जाते. त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी पोलिसांची असते. त्यामुळे ही वाहने पोलिस ठाण्यालगत ठेवल्याने तेथे भंगारबाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. .अनेक वाहने गेली सडून जुनी वाहने, ट्रॅक्टर, रिक्षा, याशिवाय अनेक चारचाकी वाहने, दुचाकी वाहने ही एकाच जागेवर अनेक वर्षांपासून ठेवण्यात आल्याने सडून गेल्याचे प्रकारसुद्धा घडतात. काही वाहनांना गंज चढतो तर काही वाहनांच्या चाकातील हवासुद्धा निघून जाते. विविध प्रकारचे स्पेअर पार्ट पावसाने, उन्हाने तसेच धुळीमुळे खराब होतात. त्यामुळे हे वाहने नेण्यासाठी इच्छुक नसतात..पोलिस ठाण्यामध्ये विविध गुन्ह्यातील वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाला लेखी देऊन मागविली आहे, तसेच पोलिस ठाण्यात असलेले वाहन मूळ मालकांनी कागदपत्रांची पूर्तता करून व योग्य त्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर घेऊन जावे. -रघुनाथ शेगर, पोलिस निरीक्षक, दिंडोरी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.