Dindori Drought : दिंडोरी तालुक्यात दुष्काळ जाहीर; खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची अपेक्षा

Dindori Drought Declaration: परतीच्या पावसाने दडी मारल्याने दिंडोरी तालुक्यातील भात, सोयाबीन आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाले. मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून नुकसानभरपाईची अपेक्षा वाढली आहे.
Dindori Drought Declaration

Dindori Drought Declaration

esakal

Updated on: 

वणी: परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेल्या दिंडोरी तालुक्याचा अखेर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे. चिपळूण, दिंडोरी, वाडा आणि विक्रमगड या चार तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय आज मुंबईत झालेल्या उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...