Monsoon
sakal
लखमापूर /वणी: दिंडोरी तालुक्यात सततच्या पावसाने तालुक्यातील धरणेही उशिरा का होईना भरली आहेत. जून ते ऑगस्ट दरम्यान दिंडोरी तालुक्यात सरासरी ५३१.१ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र तालुक्यात प्रत्यक्षात ६४३.१ मिलिमीटर पाऊस झाला असून १२१.१ टक्के पाऊस होऊन सरासरी ओलांडली आहे.