दिंडोरी- शहरातील गांधीनगर येथील जखमी युवकाचा नाशिक ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. या युवकाचा खून की अपघात याचे कोडे असून, पोलिसांपुढे धागेदोरे शोधण्याचे आव्हान आहे. सोमवारी (ता. १६) गांधीनगर येथील यश पारधी हा १६ वर्षीय युवक बाजार पटांगणात जखमी अवस्थेत आढळला होता. त्याच्या चेहऱ्याला जबरदस्त मार लागलेला होता. त्याचबरोबर त्याच्या नाक व कानालाही मार लागलेला होता.