नरकोळ- उन्हाळ्यात झाडाच्या खोडापासून निघणाऱ्या पांढराशुभ्र डिंकाला शोधण्यासाठी महिलांची लगबग सुरू होते. नरकोळ, जाखोड येथील महिलांना उन्हाळ्यात या डिंकापासून रोजगार उपलब्ध होतो. हिवाळ्यात डिंकाचे लाडू बनवण्यासाठी डिंक हा महत्त्वाचा असून यासाठी ठराविक वेळातच झाडांपासून डिंक उपलब्ध होतो. तो शोधण्याचे काम हे महिला दरवर्षी करत असतात. गतवर्षापेक्षा यंदा हा डिंक १०० रुपयांनी महागला आहे.