Diploma Admission: हातमाग, वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी 20 जूनपर्यंत मुदत; येथे मिळवा माहिती

Handloom
Handloomesakal

Diploma Admission : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे.

इच्‍छुक विद्यार्थ्यांनी २० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त एम. जे. प्रदीप चंदन यांनी केले आहे. (Diploma Admission Deadline till June 20 for Diploma in Handloom Textile Technology nasihk news)

Handloom
Education News : आदिवासी विद्यार्थिनीला शिक्षणासाठी साहाय्य; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओडिशा सरकार सरसावले

केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय सत्रासाठी ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ व वेंकटगिरी येथे प्रवेश सुरू आहेत.

आयआयएचटी बरगढ येथे चौदा आणि वेंकटगिरी येथे दोन जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत २० जूनपर्यंत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मागविले आहेत.

उमेदवारांसाठी अधिक माहिती व अर्जाचा नमुना https://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्‍ध केला आहे. तसेच सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी rddtextiles3mumbai@rediffmail.com या ई-मेलवर किंवा ०२२-२३७००६११ या कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे एम. जे. प्रदीप चंदन यांनी सांगितले.

Handloom
Foreign Education : उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल तर द्यावी लागेल ही परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com